संगीत नाटक अकादमी पुरस्कार २०२२ राष्ट्रपतिंच्या हस्ते नवी दिल्लीत

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं २०२२ आणि २०२३ या वर्षांसाठीचे ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ प्रदान केले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला तसंच कठपुतळी आणि संबंधित नाट्य कला प्रकारात १९५२ पासून हे पुरस्कार दिले जातात. मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि भारतीय शास्त्रीय संगीतातल्या नामवंत गायिका देवकी पंडित आणि  कलापिनी कोमकली यांनाही हा  पुरस्कार मिळाला आहे. एक लाख रुपये, ताम्रपट आणि महावस्त्र असं पुरस्काराचं स्वरुप आहे. त्याखेरीज नामवंत कलाअभ्यासकांना ‘संगीत नाटक अकादमी गौरववृत्ती’ने सन्मानित करण्यात आलं.  ज्येष्ठ कला अभ्यासक विनायक खेडेकर यांचा त्यात समावेश आहे. ३ लाख रुपये आणि ताम्रपट असं गौरववृत्तीचं स्वरुप आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये आणि ताम्रपट या स्वरुपाचे युवा पुरस्कार ८० उदयोन्मुख कलाकारांना मिळाले आहेत.

शासन निर्णय

Team MD

3/6/20241 min read