आगामी लोकसभा निवडणूक २०४७ पर्यंत भारताला विकसित करण्यासाठी असल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन

देशाच्या लोकशाहीला मजबूत करणाऱ्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करा. ही निवडणूक २०४७ पर्यंत भारताला विकसित करण्यासाठी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज जळगावमध्ये युवा संमेलनात केलं. लशीपासून इतर अनेक वस्तूंचं उत्पादन देशातचं होतंय. गेल्या १० वर्षात देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर १० व्या वरुन ५ व्या स्थानावर पोहचली आहे. दररोज २ नवी महाविद्यालय, ३ स्वस्त औषध दुकानं तयार होत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली. युवकांच्या सक्रीय सहभागातूनच विकसित भारताचं स्वप्न साकारता येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यावेळी म्हणाले. केंद्र सरकारकडून पायाभूत सुविधांना मोठ्या प्रमाणात चालना दिली जात असल्यानं येत्या ५ वर्षात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी मंत्री गिरीश महाजन, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्यापूर्वी त्यांनी अकोल्यात सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. संध्याकाळी ते छत्रपती संभाजीनगरमध्ये सभेला संबोधित करणार आहेत. 

लोकसभा निवडणूक २०२४

Team Maharashtra Deshay

5/4/20231 min read

My post content