एमएमआरडीए आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात करार

महानगरातल्या रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज करार करण्यात आला. माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर इथल्या सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी मंत्रालयात झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत हा करार झाला. यावेळी इतर महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच वांद्रे कुर्ला संकुलात पाॅड टॅक्सी प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करायला मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्यता दिली. यावेळी मंत्री शंभूराज देसाई, आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध रस्ते प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. एमएमआरडीएमार्फत विशेष प्रयोजन वाहन कंपनीची स्थापना करायला यावेळी मान्यता देण्यात आली. पैठण इथल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याबाबतही आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक झाली. या कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Welcome to Maharashtra Deshay, your source for news and knowledge in your own language. Stay informed about the latest government schemes, important decisions, agricultural updates, global job opportunities, competitive exam guidance, and inspiring stories of farmers. We are committed to providing accurate and timely information to help you achieve your goals.

boats on body of water
boats on body of water