प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात झालेल्या नावनोंदणीमध्ये २७ टक्क्यांनी वाढ

प्रधानमंत्री पीक विमा  योजने’ अंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात झालेल्या नावनोंदणी मध्ये तब्बल २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर गेल्या आठ वर्षात सुमारे ५७ कोटी शेतकऱ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली होती तर २३ कोटींपेक्षा अधिक शेतकरी अर्जदारांना लाभ मिळाले होते, असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. या काळात शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी सुमारे ३१ हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांचा भरणा केला होता. ज्यावर त्यांना एक लाख ५५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक लाभ देण्यात आला होता. शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रत्येक शंभर रुपयांच्या हप्त्यामागे त्यांना पाचशे रुपये  दाव्याच्या रूपात मिळाले असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ राज्य आणि शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून यामध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षांपासून सातत्यानं वाढ होत आहे. विमा हप्त्याच्या बाबतीत जागतिक स्तरावरची ही  तिसरी सर्वात मोठी विमा योजना असून या अंतर्गत अनपेक्षित आपत्तींमध्ये  होणाऱ्या  नुकसानीमुळे शेतकऱ्यांना संरक्षण मिळतं. 

हिरवं शिवार

Team MD

3/6/20241 min read

My post content